ज्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांनी हातात भगवा झेंडा घेऊन स्वाभिमान, हिंदुत्वाचा विचार शिकवला, त्याच पक्षातील आमदार, खासदारांना जय सोनिया गांधी, जय राहुल गांधी, जय शरद पवार हे शिकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.